Face Care: उन्हाळ्यातही ग्लोईंग चेहरा पाहिजे? मग ५ मिनिटांत तयार होणारा 'हा' फेसपॅक नक्की लावा

Shruti Vilas Kadam

त्वचा ग्लो करते

बेसन आणि हळद त्वचेतील मळ, तेलकटपणा कमी करून नैसर्गिक उजळपणा देतात. नियमित वापराने त्वचा तजेलदार दिसते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि अॅक्ने कमी करण्यास मदत

मुलतानी माती आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

Face Care | Saam Tv

अतिरिक्त तेल नियंत्रित करते

मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, त्यामुळे ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर ठरतो.

Face Care

त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो

चंदन पावडर आणि गुलाबजल त्वचेला थंडावा देतात, लालसरपणा आणि जळजळ कमी करतात.

Face Care

डेड स्किन काढून टाकते

बेसन नैसर्गिक स्क्रबप्रमाणे काम करते, ज्यामुळे डेड त्वचा निघून जाते आणि त्वचा मऊ व स्वच्छ होते.

Face Care

फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत

एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन, 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा मुलतानी माती, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल घालून पेस्ट तयार करा.

Face care | Saam Tv

कसा वापरायचा?

ही पेस्ट चेहऱ्यावर समानपणे लावा, 15-20 मिनिटे सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.

Face Care | Saam Tv

Unique Blouse Design: लग्नसराईसाठी साध्या साड्या ते पैठणीसाठी ट्राय करा या 7 नव्या ट्रेंडी यूनिक ब्लाऊज डिझाईन्स

Unique Blouse Design | Saam Tv
येथे क्लिक करा