Shruti Vilas Kadam
काकडी त्वचेला थंडावा देऊन सनबर्न आणि जळजळ कमी करते, तर ॲलोव्हेरा त्वचेला शांत ठेवतो.
दोन्ही घटक त्वचेला खोलवर ओलावा देतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी दिसते.
काकडीचे स्लाइस डोळ्यांवर ठेवल्यास काळी वर्तुळे आणि सूज कमी होते.
ॲलोव्हेरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते.
नियमित वापराने त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि चमकदार दिसते.
काकडीचा रस आणि ॲलोव्हेरा जेल समान प्रमाणात मिसळून चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा, नंतर थंड पाण्याने धुवा.
हा उपाय ऑयली, ड्राय आणि सेन्सिटिव्ह सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे.