Shruti Vilas Kadam
काकडी एक नैसर्गिक थंडावा देणारा घटक आहे. सकाळी उठल्यावर काकडीचा रस काढून कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा, १०-१५ मिनिटं ठेवा आणि ताज्या पाण्याने धुवा.
काकडीतील अँटीऑक्सिडंट्स सूज, डार्क सर्कल आणि तैलीयपणा कमी करतात.
‘राइस वॉटर’ म्हणजे तांदूळ रात्री भिजवून ठेवलं तर त्याचं पाणी सकाळी चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कॉटनने लावा.
हे त्वचेला टोनरप्रमाणे काम करतं, पोर्स टाइट करायला मदत करतं आणि त्वचा नैसर्गिकपणे चमकदार बनते.
एक चमचा बेसन घेऊन त्यात चिमुटभर हळद आणि थोडं गुलाब जल मिसळा, पेस्ट तयार करा. हलक्या हाताने मॅसेज करत चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुवा. हे त्वचेवरील मृत पेशी दूर करतं, टॅनिंग कमी करतं, आणि चेहरा उजळ करतो.
जर त्वचा तैलीय आहे किंवा पिळपिळीत वाटत असेल तर दही आणि मुल्तानी माती समान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करा.
१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. हे उपाय त्वचेला थंडावा देतात, पिंपल्स कमी करतात आणि ताजेतवाने, स्वच्छ व मऊ त्वचा मिळवून देतात.