Manasvi Choudhary
चेहरा सुंदर दिसण्यासाठी मुली आणि महिला अनेक उपक्रम करत असतात.
यासाठी महिला पार्लर तसेच विविध महागड्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात.
मात्र, महागड्या उत्पादनापेक्षा घरगुती उपाय केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
चेहऱ्याला घरगुती पध्दतीचं तूप लावल्याने चेहरा चमकू लागतो.
तूपामध्ये ए,डी, ई हे जीवसत्वे असल्याने चेहरा मुलायम होतो.
चेहऱ्यावरची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही चेहऱ्याला रात्रभर तूप लावून झोपा.
चेहऱ्याला दूध आणि तूप मिक्स करून लावल्याने त्वचेवरचे काळे डाग कमी होतील आणि त्वचा चमकेल.
चेहऱ्याशिवाय तुम्ही ओठांना देखील तूप लावू शकता यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.