ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहरा सुंदर करण्यासाठी बेसन आणि हळद वापरली जाते. जर चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावर बेसन आणि हळद लावले तर याचे दु।्परिणाम देखील होऊ शकतात.
वारंवार बेसन लावल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे चेहरा खूप कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो.
हळद लावल्याने चेहरा बराच काळ पिवळा राहू शकतो, ज्यामुळे बाहेर जाताना लूक खराब होऊ शकतो.
संवेदनशील त्वचा असलेल्यांनी हळद आणि बेसन वापरु नये. यामुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.
जर त्वचा तेलकट असेल तर बेसन आणि हळदीचा पॅक पोअर्स बंद करू शकतो आणि यामुळे पिंप्लस येऊ शकतात.
काही लोकांना हळदीमध्ये असलेल्या करक्यूमिनची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ येऊ शकतात.
बेसन आणि हळदीचा पॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करा. अॅलर्जी नसेल तरच हा पॅक वापरा.