ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोक त्यांचे नखं सुंदर ठेवण्यासाठी पार्लरला जातात. परंतु कधीकधी नखं पिवळे होतात. यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.
नखांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास नखं पिवळी पडतात. यावर उपचार न केल्यास हा इन्फेक्शन वाढू शकतो.
अँटीबायोटिक्स, केमोथेरिपी किंवा काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे नखांचा रंग पिवळा होतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सतत नेलपेंट लावल्याने नखं कमकुवत होतात. म्हणून सतत नेलपेंटचा वापर करु नका.
सिगारेटचा धूर आणि निकोटीन नखांच्या रंगावर परिणाम करू शकतात. सतत धूम्रपान केल्याने नखांचा नैसर्गिक पांढरा रंग हळूहळू पिवळा होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी१२, आयरन किंवा झिंकच्या कमतरतेमुळे नखे कमकुवत आणि पिवळी होऊ शकतात. यामुळे संतुलित आहार घ्या.
मधुमेह, थायरॉईड किंवा फुफ्फुसांच्या समस्यांसारख्या आजारांमुळेही नखे पिवळी होऊ शकतात. जर नखे बराच काळ पिवळी राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.