Shruti Vilas Kadam
गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक ओलावा देते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्यामुळे गुलाबपाणी लावल्याने ती मऊ आणि तजेलदार राहते.
हिवाळ्यातही गुलाबपाणी नैसर्गिक टोनरचे काम करते. ते रोमछिद्र घट्ट ठेवते आणि त्वचेवरील धूळ-मळ स्वच्छ करण्यास मदत करते.
गुलाबपाणी हे सौम्य असते तसेच त्याच्यात कोणतेही केमिकल नसते त्यामुळे ते स्किन-फ्रेंडली आहे. त्यामुळे संवेदनशील त्वचेसाठी हिवाळ्यात ते सुरक्षित पर्याय ठरते.
थंड वाऱ्यामुळे चेहरा कोरडा पडतो, पण गुलाबपाण्यातील नैसर्गिक हायड्रेटिंग घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.
हिवाळ्यात चेहरा निर्जीव वाटल्यास गुलाबपाणी स्प्रे केल्याने फ्रेशनेस येतो आणि चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळतो.
गुलाबपाणी क्रीम, अलोव्हेरा जेल किंवा ग्लिसरीनसोबत मिसळल्यास त्याचा त्वचेला अधिक लाभ होतो आणि कोरडेपणा पूर्णपणे कमी होतो.
जरी गुलाबपाणी फायदेशीर असले तरी दिवसातून २–३ वेळा पेक्षा जास्त वापर टाळावा, कारण जास्त ओलसरपणामुळे त्वचा चिकट होऊ शकते.