Face Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क , दोन आठवड्यात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

वापरण्याची योग्य पद्धत

एका वाटीत २ चमचे तांदळाचं पाणी आणि १ चमचा अ‍ॅलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता.

Face Care | Saam tv

त्वचा हायड्रेट राहते

अ‍ॅलोवेरा जेल त्वचेला ओलावा देण्याचं काम करतं. कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ आणि फ्रेश दिसण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

face Care | Saam Tv

पिंपल्स आणि लालसरपणा कमी करण्यास मदत

अ‍ॅलोवेरामधील अँटीबॅक्टेरियल गुण आणि तांदळाच्या पाण्यातील शांत करणारे घटक त्वचेवरील जळजळ आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकतात.

Face Care | Saam Tv

त्वचा टाईट आणि स्मूथ दिसते

तांदळाचं पाणी नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करू शकतं. त्यामुळे त्वचेवरील ओपन पोर्स कमी दिसून त्वचा अधिक स्मूथ वाटू शकते.

Face Care | Saam Tv

सनटॅन कमी करण्यास उपयोगी

उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर तांदळाचं पाणी आणि अ‍ॅलोवेरा जेल त्वचेला थंडावा देऊन टॅन कमी करण्यास मदत करू शकतात.

Face Care | Saam Tv

त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो

तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, तर अ‍ॅलोवेरा त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. दोन्ही एकत्र वापरल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू शकते.

Face Care | Saam Tv

संवेदनशील त्वचेवर आधी पॅच टेस्ट करा

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे हा उपाय वापरण्यापूर्वी हातावर किंवा मानेजवळ पॅच टेस्ट करणं सुरक्षित ठरतं.

Face Care | Saam Tv

Saree Draping Style: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

Saree Draping Style | Saam tv
येथे क्लिक करा