Shruti Vilas Kadam
2 चमचे अळशीच्या बिया 1 कप पाण्यात उकळा.मिश्रण जेलसारखे घट्ट झाल्यावर गाळून घ्या.जेल थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावा.15 ते 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
फ्लॅक्ससीड्स जेलमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ व तजेलदार दिसू लागते.
अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेची लवचिकता सुधारून ती अधिक तरुण दिसण्यास मदत करतात.
फ्लॅक्ससीड्स जेल नियमित वापरल्यास त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
हा फेस मास्क त्वचेतील मळ आणि अतिरिक्त तेल कमी करून त्वचेला स्वच्छ, ताजेतवाने आणि नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतो.
अळशीतील दाहरोधक (Anti-inflammatory) गुणधर्म त्वचेवरील लालसरपणा, जळजळ आणि पिंपल्समुळे होणारी सूज कमी करण्यास मदत करू शकतात.
संवेदनशील त्वचा असल्यास प्रथम पॅच टेस्ट करा. कोणतीही अॅलर्जी किंवा जळजळ जाणवल्यास वापर थांबवा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.