Face Care: चेहरा खूप ड्राय झालाय? मग नॅचरल मॉइश्चराझरसाठी आठवड्यातून २ वेळा लावा हा फेसपॅक

Shruti Vilas Kadam

फेस पॅक कसा तयार करावा?

२ चमचे ताजे कोरफड जेल घ्या.त्यामध्ये १ चमचा बेसन मिसळा. गुळगुळीत पेस्ट तयार करून चेहरा आणि मानेला लावा. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

Face Care

त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत

बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करते, तर कोरफड त्वचेला ओलावा देते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते.

Face care | Saam TV

नैसर्गिक ग्लो वाढवतो

कोरफड आणि बेसन यांचे मिश्रण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. नियमित वापराने त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स कमी होण्यास मदत

कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे मुरुमांमुळे होणारी सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत मिळू शकते.

Face Care | Saam tv

त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवते

कोरफड त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. त्यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा अधिक मऊ व तजेलदार दिसू शकते.

Face care | Saam TV

टॅनिंग कमी करण्यास उपयुक्त

सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर आलेला टॅन कमी करण्यासाठी कोरफड आणि बेसनचा फेस पॅक फायदेशीर ठरू शकतो. यामुळे त्वचेचा रंग अधिक समतोल दिसतो.

Face Care | Saam Tv

त्वचेची स्वच्छता सुधारते

बेसन नैसर्गिक क्लेन्सर म्हणून काम करते. त्वचेवरील धूळ, घाण आणि अशुद्धता दूर करून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

Face Care | Saam Tv

त्वचा तरुण दिसण्यास मदत

कोरफडमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे पोषण करतात. त्यामुळे त्वचेवरील थकवा कमी होऊन त्वचा अधिक ताजीतवानी आणि निरोगी दिसू शकते.

Face Care | Saam tv

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय ! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा