Shruti Vilas Kadam
व्हिटामिन C सीरम त्वचेतील डलनेस कमी करून नैसर्गिक ग्लो वाढवतो. त्वचेतील डाग, पिग्मेंटेशन आणि टॅन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कोरडी किंवा निस्तेज त्वचा असल्यास हायल्युरॉनिक ऍसिड सीरम अतिशय उपयुक्त. ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा तजेलदार बनवते.
नायसिनामाइड त्वचेवरील ऍक्ने, रेडनेस आणि मोठे पोर्स कमी करून त्वचा स्मूथ बनवतो. विशेषतः ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी योग्य.
रेटिनॉल सीरम सुरकुत्या, फाईन लाइन्स आणि ढिलाई कमी करण्यास मदत करते. त्वचेची रीजनरेशन प्रोसेस वेगवान करते आणि स्किन अधिक तरुण दिसते.
सीरम हलक्या टेक्स्चरचा असल्यामुळे त्वचेत पटकन शोषला जातो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि मेकअपही स्मूथ बसतो.
नियमित सीरम वापराने त्वचेला पोषण मिळते, रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागते.
सीरममधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे सूर्यप्रकाश, प्रदूषण, धूळ आणि केमिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात व त्वचा हेल्दी ठेवतात.