Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

Shruti Vilas Kadam

त्वचेला खोलवर मॉइश्चर मिळते

कोरफड जेल त्वचेत पटकन मुरते आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा देते. रोज रात्री लावल्याने त्वचा मऊ, गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि मुरुम कमी होतात

कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सची सूज कमी होते आणि नवीन मुरुम येण्याचा धोका घटतो.

Face Care

त्वचेचा पोत सुधारतो

रात्री कोरफड लावल्याने त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि नवीन पेशींची वाढ होते. त्यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारून त्वचा नैसर्गिक चमकदार दिसते.

Face Care

काळेपणा कमी होतो

नियमित वापरामुळे पिंपल्सचे डाग, सनटॅन आणि त्वचेचा काळेपणा हळूहळू कमी होण्यास मदत होते.

Face Care | Saam tv

सुरकुत्या आणि एजिंगची लक्षणे कमी होतात

कोरफडमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C व E असतात, जे त्वचेची लवचिकता वाढवतात आणि सुरकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावतात.

Face Care | Saam tv

सनबर्न आणि त्वचेची जळजळ शांत होते

दिवसभर उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे झालेली जळजळ कोरफड शांत करते. त्यामुळे त्वचा ताजी आणि आरामदायी वाटते.

Face Care | Saam Tv

त्वचा निरोगी आणि नैसर्गिक ग्लो देते

रोज रात्री कोरफड वापरल्याने त्वचा आतून पोषण मिळवते आणि सकाळी चेहरा अधिक फ्रेश व उजळ दिसतो.

Face Care

मकरसंक्रात सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवा स्वादिष्ट श्रीखंड पुरी, वाचा सोपी रेसिपी

Shrikhand Puri Recipe
येथे क्लिक करा