Shruti Vilas Kadam
अॅलोवेरा त्वचेला हायड्रेट करतो, चंदन त्वचा उजळवतो आणि गुलाबजल ताजेतवाने ठेवतो, त्यामुळे नैसर्गिक ग्लो मिळतो.
या तिन्ही घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने मुरूम, पिंपल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते.
चंदन आणि गुलाबजल त्वचेला कूलिंग इफेक्ट देतात, त्यामुळे सनबर्न आणि जळजळ कमी होते.
गुलाबजल त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करून पोअर्स टाईट करण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा फ्रेश दिसते.
नियमित वापराने त्वचेवरील काळे डाग, पिग्मेंटेशन आणि टॅन कमी होण्यास मदत होते.
१ चमचा अॅलोवेरा जेल, १ चमचा चंदन पावडर आणि १-२ चमचे गुलाबजल एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा.
हा फेसपॅक आठवड्यातून २-३ वेळा वापरल्यास त्वचा अधिक स्वच्छ, मुलायम आणि चमकदार दिसू लागते.