Shruti Vilas Kadam
बर्फाचा तुकडा स्वच्छ सूती कापडात गुंडाळा. चेहऱ्यावर गोलाकार हालचालींमध्ये १ ते २ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. एका जागेवर जास्त वेळ बर्फ ठेवू नका. दिवसातून एकदाच वापरणे पुरेसे आहे. संवेदनशील त्वचा, रोझेशिया किंवा थंडीत त्वचेला त्रास होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सकाळी उठल्यानंतर चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज दिसत असेल, तर बर्फाचा हलका मसाज केल्याने सूज कमी होण्यास मदत होते. त्वचेला ताजेपणा जाणवतो.
बर्फामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे चेहरा अधिक फ्रेश, उजळ आणि नैसर्गिक ग्लोइंग दिसू लागतो.
बर्फाचा मसाज केल्याने त्वचेवरील मोठे पोर्स काही काळासाठी लहान दिसू शकतात. त्यामुळे त्वचा अधिक स्मूद आणि स्वच्छ वाटते.
मेकअप करण्यापूर्वी १ ते २ मिनिटे बर्फाचा मसाज केल्यास त्वचा गुळगुळीत वाटते आणि मेकअप अधिक चांगला बसण्यास मदत होते.
कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचेला जळजळ किंवा उष्णता जाणवत असेल, तर कापडात गुंडाळलेल्या बर्फाचा हलका मसाज केल्याने थंडावा मिळू शकतो.
दीर्घकाळ काम, झोपेची कमतरता किंवा प्रवासामुळे त्वचा निस्तेज वाटत असेल, तर बर्फाचा मसाज केल्याने चेहरा ताजातवाना दिसू शकतो.