Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Shruti Vilas Kadam

कोरफड आणि हळद कशी वापरावी?

2 चमचे ताजी कोरफड जेल घ्या. त्यामध्ये 1/4 चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्यास चांगला परिणाम दिसू शकतो.

Face Care | Saam Tv

पिंपल्सवर नियंत्रण

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर कोरफड त्वचेला शांत ठेवते. या दोन्हींचा एकत्र वापर केल्याने पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

Face care | Saam tv

त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी होतो

संवेदनशील त्वचेवर होणारी जळजळ, खाज किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी कोरफड आणि हळदीचा फेस पॅक उपयुक्त ठरू शकतो.

Face Care | Saam Tv

डाग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत

चेहऱ्यावरील जुन्या पिंपल्सचे डाग, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी या नैसर्गिक घटकांचा नियमित वापर फायदेशीर मानला जातो.

Face Care | Saam tv

त्वचेला मॉइश्चर मिळते

कोरफड त्वचेला खोलवर हायड्रेट करते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि नैसर्गिक मऊपणा टिकून राहतो.

Face Care | Saam Tv

अँटीऑक्सिडंट्स कमी करण्यास मदत

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली कोरफड आणि हळद त्वचेवरील बारीक रेषा व सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Face Care | Saam Tv

त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी ठेवते

धूळ, प्रदूषण आणि अतिरिक्त तेलामुळे बंद झालेली छिद्रे स्वच्छ करण्यास हा फेस पॅक मदत करतो, त्यामुळे त्वचा अधिक फ्रेश दिसते.

Face Care | Saam tv

त्वचेला नैसर्गिक चमक मिळते

कोरफडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि हळदीतील कर्क्युमिन त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यास मदत करतात. नियमित वापरामुळे चेहरा अधिक उजळ आणि ताजातवाना दिसू शकतो.

Face Care | Saam Tv

Father's Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे 7 गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

Father’s Day Gift Ideas | pintrest
येथे क्लिक करा