Shruti Vilas Kadam
बेसन आणि केळे एकत्र वापरल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ आणि फ्रेश दिसते.
केळ्यातील मॉइश्चर त्वचेला हायड्रेट ठेवते, त्यामुळे कोरडी त्वचा मऊ आणि स्मूद होते.
बेसन स्क्रबप्रमाणे काम करून मृत त्वचा दूर करते आणि त्वचा स्वच्छ करते.
हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करून पिंपल्स नियंत्रणात ठेवतो.
एका वाडग्यात 2 चमचे बेसन आणि अर्धं केळं मॅश करून पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर 10–15 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
हा फेस पॅक आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास त्वचेला चांगले परिणाम दिसतात.