Shruti Vilas Kadam
हिवाळ्यातील कोरडे हवामान, वारा आणि कमी आर्द्रता यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे गाल फाटणे, लालसर होणे आणि खाज येणे या समस्या वाढतात.
काही बादाम भिजवून त्याची पेस्ट तयार करा आणि त्यात थोडं दूध मिसळा. हा पॅक गालांवर लावा आणि १० मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेला पोषण मिळते व कोरडेपणा दूर होतो.
एक चमचा बेसन, एक चमचा दही आणि थोडी हळद एकत्र करून पेस्ट बनवा. गालांवर हलक्या हाताने लावा. हा उपाय त्वचा उजळवतो आणि तिला मऊपणा देतो.
झोपण्यापूर्वी गालांवर कोमट नारळ तेलाने हलकी मालिश करा. त्यातील नैसर्गिक फॅटी ऍसिड्स त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात आणि फाटलेले गाल बरे करतात.
अॅलोवेरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. गालांवर त्याचा थंड जेल लावल्याने जळजळ, सूज आणि कोरडेपणा कमी होतो.
एक चमचा मध आणि अर्धा चमचा साखर मिसळून सौम्य स्क्रब तयार करा. हा स्क्रब गालांवरील मृत त्वचा काढतो आणि नैसर्गिक चमक आणतो.
हे घरगुती उपाय साध्या कोरडेपणासाठी उपयुक्त आहेत. परंतु गालांवर जास्त सूज, पुरळ किंवा वेदना असल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.