Shruti Vilas Kadam
पिंपल्स फोडल्याने त्वचेच्या आतल्या थराला इजा होते. यामुळे चेहऱ्यावर काळे किंवा खोल डाग कायमचे राहू शकतात.
हात स्वच्छ नसतील तर पिंपल फोडताना जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे पिंपल अधिक सुजलेले, लाल आणि वेदनादायक होऊ शकतात.
एक पिंपल फोडल्याने त्यातील बॅक्टेरिया आजूबाजूच्या त्वचेत पसरतात आणि नवे पिंपल्स तयार होतात.
पिंपल फोडल्याने त्वचेत दाह निर्माण होतो. यामुळे चेहरा सुजलेला दिसतो आणि खाज किंवा जळजळ जाणवू शकते.
पिंपल फोडल्यामुळे त्या ठिकाणी काळेपणा किंवा लालसरपणा निर्माण होतो, ज्यामुळे त्वचेचा टोन बिघडतो.
पिंपल फोडताना रक्त येणे, दुखणं किंवा जखम होण्याची शक्यता असते. ही जखम बरी व्हायला वेळ लागतो.
वारंवार पिंपल फोडल्याने त्वचा कमजोर आणि अधिक संवेदनशील बनते, त्यामुळे भविष्यातील स्किन प्रॉब्लेम्स वाढू शकतात.