Shruti Vilas Kadam
जर तुमचे ओठ कोरडे असतील तर मॅट लिपस्टिक टाळा आणि क्रीम किंवा मॉइश्चरायझिंग लिपस्टिक निवडा. नॉर्मल ओठांसाठी कोणतीही लिपस्टिक योग्य ठरते.
प्रत्येक लिपस्टिक शेड प्रत्येक स्किन टोनला शोभेलच असे नाही. गोऱ्या त्वचेसाठी पिंक, न्यूड शेड्स, तर सावळ्या त्वचेसाठी ब्राउन, वाईन, रेड शेड्स अधिक उठून दिसतात.
लिपस्टिकमध्ये पॅराबेन, लीड, सल्फेट्स यांसारखे घातक घटक नसावेत. शक्य असल्यास हर्बल किंवा ऑर्गेनिक लिपस्टिक वापरा.
एक्सपायर झालेली लिपस्टिक वापरल्यास ओठांवर इन्फेक्शन किंवा अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे खरेदीपूर्वी एक्सपायरी डेट तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लिपस्टिक हातावर ट्राय केल्याने खरी शेड कळत नाही. शक्य असल्यास ओठांच्या जवळ ट्राय करूनच लिपस्टिक खरेदी करा.
लाँग लास्टिंग लिपस्टिक जास्त ड्राय असतात. त्यामुळे त्यात मॉइश्चर आणि व्हिटॅमिन ई आहे का, हे तपासा.
स्वस्त लिपस्टिकपेक्षा चांगल्या ब्रँडची लिपस्टिक निवडा. चांगली लिपस्टिक ओठांचं सौंदर्य वाढवते आणि नुकसान टाळते.