Saam Tv
सध्या सगळी मंडळी स्क्रीनच्या संपर्कात जास्त येत असतात. त्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश असतो.
काही वेळेस तुम्हाला कामानिमित्त स्क्रीनवर जास्त काळ राहावं लागू शक्त. अशा वेळेस तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घरातल्या काही फळ भाज्यांचा समावेश करू शकता.
तुम्ही रोजच्या आहारात आवळा, गाजर, संत्री, द्राक्षे, हिरव्या पालेभाज्या, लिंबू या महत्वाच्या पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे.
आवळ्याचे सेवन तुमच्या डोळ्यांसाठी चांगल कवच आहे. याचे सेवन केल्याने तुमच्या चष्म्याचा नंबर काही दिवसातच कमी होऊ शकतो.
जर तुमच्या डोळ्यात जाळी किंवा डोळ्यांशी संबंधित कोणताही आजार निर्माण होत असेल तर तो वाढवण्यापासून रोखेल आणि तुमचे डोळे हळूहळू बरे होतील.
तुम्ही बातमीत नमुद केलेल्या भाज्यांचा आहारात समावेश केला असेल तर तुम्ही होणाऱ्या किंवा झालेल्या मोतीबिंदूपासून लांब राहू शकता.
खाण्याबरोबर तुम्ही अनेक व्यायामांचा सुद्धा सहभाग तुमच्या आयुष्यात करू शकता. त्याने तुमच्या डोळ्यावरचा चष्मा दूर राहण्यास मदत होईल.