Beauty Tips: Eyebrowचे केस अचानक गळतायेत अन् बारिक दिसतायेत? मग या टिप्स नका करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

सुंदर चेहरा

महिलांना सुंदर दिसण्यासाठी सुंदर चेहऱ्यासोबत सुंदर आयब्रो सुद्धा असणे गरजेचे असते.

eyebrow hair fall | pinterst

दैनंदिन समस्या

काही महिलांना अचानक आयब्रोचे केस कमी होण्याच्या समस्या जाणवतात. या समस्येची काही सामान्य कारणे आणि टाळायला हवीत अशा सवयी जाणून घ्या.

thinning eyebrows | google

जास्त प्लकिंग करू नका

वारंवार थ्रेडिंग किंवा प्लकिंग केल्याने भुवयांच्या केसांची मुळं कमकुवत होतात. यामुळे केसांची वाढ थांबते आणि भुवया पातळ दिसतात.

eyebrow growth tips | google

हेवी मेकअप टाळा

भुवयांवर दररोज हेवी मेकअप, जेल किंवा वॅक्स लावल्याने केसांच्या मुळांवर ताण येतो. यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते.

eyebrow growth tips | google

कमी झोपेच्या समस्या

झोपेची कमतरता आणि तणावामुळे हार्मोनल बदल घडतात. ज्याचा परिणाम भुवयांच्या केसांवर होतो.

eyebrow growth tips | google

न्यूट्रिशनची कमतरता

बायोटिन, व्हिटॅमिन ई, झिंक आणि प्रोटीनची कमतरता असल्यास केस पातळ आणि कमकुवत होतात.

eyebrow growth tips | google

हार्श केमिकल्स टाळा

फेस वॉश किंवा क्लेंझरमध्ये असलेले अल्कोहोल किंवा सल्फेटयुक्त घटक भुवयांच्या मुळांना कोरडे करतात.

eyebrow growth tips | pintrest

हायपोथायरॉईड तपासा

अचानक भुवया गळत असल्यास थायरॉईड असंतुलन किंवा त्वचेचा संसर्ग कारणीभूत असू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

eyebrow growth tips

भुवयांवर तेल मसाज करा

कॅस्टर ऑईल किंवा बदाम तेलाने दररोज भुवयांवर हलका मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ सुधारते.

eyebrow growth tips

NEXT: WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

WhatsApp Latest Update | google
येथे क्लिक करा