Eye Twitching : डोळे सतत फडफडतात? शुभ-अशुभ नव्हे, शरीर देतेय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Shreya Maskar

डोळे फडफडणे

अनेक लोक डोळे फडफडण्याचा संबंध शुभ-अशुभ संकेतांशी लावतात, जे की चुकीचे आहे. सतत डोळा फडफडत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

fluttering eyes | pinterest

डोळा फडफडण्याची सामान्य कारणे

वैद्यकीय भाषेत पापणीच्या अनैच्छिक हालचालीला Eyelid Myokymia असे म्हणतात. झोपेची कमतरता, मानसिक ताण, जास्त कॅफिनचे सेवन आणि डोळ्यांवर येणारा ताण ही त्याची सामान्य कारणे आहेत.

Common causes of eye flutter | pinterest

डोळे कोरडे पडणे

डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ, खाज किंवा डोळ्यांत काहीतरी असल्याची भावना यांसोबत पापणी फडफडू शकते. सतत स्क्रीन पाहिल्याने हा त्रास वाढतो.

Dry eyes | pinterest

पापण्यांची सूज

पापण्यांच्या कडांना सूज येणे, लालसरपणा, खाज आणि पापण्यांवर खपल्या किंवा चिकट थर तयार झाला असेल, अशा वेळीही पापण्यांची फडफड होते.

Swelling of the eyelids | pinterest

ब्लेफरोस्पॅझम

ब्लेफरोस्पॅझम हा डोळ्याभोवतीच्या स्नायूंच्या अनैच्छिक आकुंचनाशी संबंधित दुर्मिळ विकार आहे. यात वारंवार डोळे फडफडले जातात. तसेच डोळे उघडण्यात अडचण येते.

Blepharospasm | pinterest

हेमिफेशियल स्पॅझम

हेमिफेशियल स्पॅझम स्थितीत चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू अनियंत्रितपणे आकुंचन पावतात. सुरुवातीला एका डोळ्याची पापणी फडफडते आणि नंतर गाल किंवा तोंडाच्या बाजूचे स्नायूही हलू शकतात.

Hemifacial spasm | pinterest

उपाय काय?

पुरेशी झोप घ्या आणि नियमित विश्रांती घ्या. चहा-कॉफीचे अतिसेवन टाळा. स्क्रीन वापरताना मध्येच ब्रेक घ्या आणि वारंवार डोळे मिचकवा.

sleep | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...