ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पूर्वीच्या मान्यतेनुसार डोळा फडकला कि, काहीतरी संकट येणार आहे किंवा वाईट घडणार आहे असे म्हटले जायचे. पण यामागचे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का?
थकवा आणि स्ट्रेसमुळे डोळा फडकतो हे देखील एक कारण आहे. पण डॉक्टरांच्या मते शरीरातील काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे डोळा फडकतो.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ किंवा व्हिटॅमिन डीची कमी असेल तर, तुम्हाला डोळा फडकण्याची समस्या उद्भवते.
व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन्स असतात.
अशी अनेक फळं आणि हिरव्या भाज्या आहेत ज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे दोन्ही व्हिटॅमिन्स आढळतात.
यासाठी तुम्ही एवोकॅडो, किवी, संत्री यांसारखी फळे तर मशरूम, पालक, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राऊट्स अशा भाज्यांचा आहार घेऊ शकता.
या व्हिटॅमिन्स शिवाय मॅग्नेशियम किंवा इलेक्ट्रोलाइट्स सारख्या पोषक तत्त्वांची कमतरता देखील डोळे फडकण्याचे कारण बनू शकते.
केळी, रताळे, काकडी, एवोकॅडो, बटाटे, शेंगा, नट्स आणि बिया, टरबूज, नारळपाणी, दही, दूध अशा भाज्या, फळं आणि पदार्थांच्या सेवनाने तुम्ही तुमच्या शरीरातील मॅग्नेशियम आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमी पूर्ण करू शकता.