Alisha Khedekar
सकाळी उठल्यावर तुमच्याही डोळ्यांच्या कोपऱ्यात चिकट घाण आढळत असेल. मात्र, ही घाण वारंवार येत असेल तर कारण जाणून घ्या.
आपण दिवसभर बाहेर फिरत असतो. यादरम्यान बाहेरची घाण आपल्या डोळ्यांमध्ये जमा होते. झोपून उठल्यावर डोळे बराच वेळ बंद राहिल्याने ती घाण डोळ्यांच्या कोपऱ्यावर दिसून येते.
डोळ्यातून सतत पिवळी किंवा काळी चिकट घाण येत असेल तर डोळ्यांना संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.
घाणीसोबत डोळे लाल होणे, खाज येणे किंवा जळजळ जाणवणे हे कंजंक्टिव्हायटिससारख्या आजाराची लक्षणे असू शकतात.
बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळ्यातून जास्त घाण तयार होत असेल तर अशावेळी दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बाहेरची धूळ किंवा मेकअप प्रॉडक्टमुळे अॅलर्जी होऊन डोळ्यांमध्ये खाज, पाणी आणि चिकट घाण बाहेर येऊ शकते.
डोळ्यात घाण जमा झाल्यास हाताने चोळण्याऐवजी स्वच्छ पाण्याने हलकेच साफ करा आणि टॉवेल शेअर करू नका.