ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेशवाईच्या काळात "साडेतीन शहाणे" ही संज्ञा वापरली जात असे. ही काळातील काही अत्यंत मुत्सद्दी, धोरणी आणि कार्यक्षम व्यक्तींना संबोधण्यासाठी होती.
मात्र या साडेतीन शहाणे यांच्यामध्ये कोणचा समावेश होता हे तुम्हाला माहितीये का?
सखारामपंत बोकील हे पेशवेकालीन एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली मुत्सद्दी, राजकारणी व प्रशासक होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि कसलेले राजकारण करण्याची क्षमता होती.
देवाजीपंतांनी पेशव्यांच्या सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत तसंच महसूल गोळा करण्याच्या पद्धतींमध्ये त्यांचं योगदान मोठे होतं.
विठ्ठल सुंदर हे मुख्यतः निजाम आणि हैदराबाद दरबाराशी संबंधित होते, परंतु मराठा साम्राज्यातही त्यांचा प्रभाव चांगला होता. त्यांच्याकडे दोन्ही बाजूंनी राजकीय परिस्थिती हाताळण्याची आणि संबंधात संतुलन राखण्याची क्षमता होती.
नाना फडणवीस यांना 'अर्धे शहाणे' म्हटले जातं होतं याचं कारण ते युद्धभूमीवर प्रत्यक्ष तलवार चालवून नेतृत्व करत नव्हते.
नानांना 'अर्धे' संबोधले जाण्यामागे ही त्यांच्या बुद्धिमत्तेचा कमीपणा दर्शवणारी संज्ञा नव्हती, तर त्यांच्या कार्याचे स्वरूप अधोरेखित करणारी होती.