Surabhi Jayashree Jagdish
बर्याचदा महागडी नेल पॉलिश घरात ठेवून-ठेवून घट्ट होते किंवा सुकू लागते. या सुकलेल्या नेल पॉलिशला फेकून देण्याऐवजी या ७ उपायांनी पुन्हा तुम्ही वापरू शकता.
जर तुमची आवडती नेल पॉलिश सुकली असेल, तर बाटलीत काही थेंब नेल पॉलिश रिमूव्हर टाका.
सुकलेली नेल पॉलिश पुन्हा वापरण्यासाठी बाटली ५ मिनिटांसाठी कोमट पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे नेल पॉलिश परत पातळ होईल.
सुकलेली नेल पॉलिश आर्टवर्क, गिफ्ट बॉक्स किंवा डेकोरेटिव्ह क्राफ्टमध्ये वापरू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे.
मार्केटमध्ये मिळणारा नेल पॉलिश थिनर टाका. त्यामुळे टेक्स्चर स्मूद होईल आणि आवडती नेल पॉलिश पुन्हा वापरता येईल.
नेल पॉलिशचा वापर ज्वेलरी सजवण्यासाठीही करू शकता. जुने इअररिंग, रिंग किंवा हेअरपिनला नेल पॉलिशने पेंट करून त्यांना नवा लुक द्या.
जुनी की-चेन, क्लिप किंवा बॅग चार्मवर नेल पॉलिश लावून त्यांना स्टायलिश बनवा. त्यामुळे तुम्हाला नवा लुक मिळेल.