ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना एसीशिवाय झोप लागत नाही. उष्ण आमि दमट वातावरणात एसीची हवा अल्हादायक वाटते.
बऱ्याचदा अनेक लोकांच्या एसीमधून खूप पाणी बाहेर पडते. ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात.
एसीमधून पाणी बाहेर पडणे हे सामान्य आहे, परंतु जर जास्त प्रमाणात एसीमधून पाणी बाहेर पडत असेल तर हे धोक्याची घंटा असू शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एसीमधून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडण्याचे कारण काय, जाणून घ्या.
जर तुमच्या एसीमध्ये गॅसची कमतरता असेल तर तुमच्या एसीमधून जास्त पाणी बाहेर पडू शकते.
एसीमधून गॅस गळती होत असल्यास एसमधून भरपूर पाणी बाहेर पडू शकते.
एसीचा फिल्टर स्वच्छ नसल्यास अनेकवेळा एसीमधून पाणी गळण्याची समस्या होते.