ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिठाचे अतिप्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी जास्त मीठ खाऊ नये.
आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास हाडे कमकुवत होतात. हाडांची समस्या असेल तर कमी मीठ खावे.
रोज अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. आणि स्मरणशक्ती कमी होते.
मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रोल वाढते.
आहारात सोडियमची मात्रा वाढल्यास वजन वाढते. त्यामुळे जास्त मीठ खाणे टाळावे.
अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यास किडनीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी जमा होऊन हातापायाला सूज येऊ शकते. त्यामुळे रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: सतत थकवा जाणवतोय? दुर्लक्ष करू नका, असू शकतं 'हे' गंभीर कारण