Rohini Gudaghe
पेपरला जाताना उपाशीपोटी जाऊ नये. अन्यथा परीक्षेदरम्यान थकवा येण्याची शक्यता असते.
परीक्षा केंद्रावर जाताना वाहतूक कोंडी शक्यता गृहीत धरून घरातून लवकर निघावे
परीक्षेसाठी हॉल तिकीट अतिशय गरजेचे असते. अन्यथा परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आठवणीने हॉल तिकीट सोबत घ्यावं.
पेपर लिहिण्यासाठी चांगला पेन सोबत ठेवा. तसंच कंपासात इतर महत्वाच्या गोष्टी सोबत ठेवाव्यात.
अनेकदा डिजीटल उपकरणांच्या साहाय्याने परीक्षेत गैरप्रकार केला जातो. त्यामुळे डिजीटल उपकरण सोबत नेणं टाळावं.
अनेकदा पेपर लिहिताना पुरवणी घेतली जाते. पुरवणी दोऱ्याने बांधावी. स्टेपलरचा वापर करु नये.
पेपर लिहिताना प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये. अन्यथा समस्या होऊ शकते.
पेपर लिहिताना सुंदर हस्ताक्षरात उत्तरे लिहावी.