Manasvi Choudhary
आजकाल मोबाईल, लॅपटॉपवरील कामांमुळे मानेवर ताण येऊन मानेचं दुखणं वाढण्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
मानेचं दुखणे घालवण्यासाठी आणि मणक्याची लवचिकता टिकवण्यासाठी योगासने हा सर्वात उत्तम मार्ग आहे.
मार्जरी आसन हे गुडघ्यांवर आणि हातांच्या तळव्यांवर वाकून करा श्वास घेताना मान वर करा आणि पाठ खाली झुकवा यामुळे मानेवर ताण येत नाही.
भुजंगासन हा योगा करताना पोटावर झोपून हातांच्या सहाय्याने शरीराचा पुढचा भाग वर उचलून आकाशाकडे पहा. यामुळे खांदे आणि मानेच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
बालासन हा योगा करताना गुडघे मुडपून टाचांवर बसा आणि कपाळ जमिनीला टेकवून हात पुढे सरळ ठेवा. हे आसन मान, पाठ आणि खांद्यांना पूर्णपणे रिलॅक्स करते.
योगा प्रकार करताना सरळ उभे राहून दोन्ही हात वर करा, बोटे इंटरलॉक करा आणि टाचा वर उचलून शरीराला वरच्या दिशेला ताणा.
ग्रीवा संचालन हा सूक्ष्म व्यायाम आहे. मान हळुवारपणे डावीकडे-उजवीकडे, वर-खाली आणि गोलाकार फिरवा. मान लवचिक होते