ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरात बऱ्याच ठिकाणाहून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलली आहेत.
यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. त्यामुळे गरज पडल्यास मदतीसाठी वेळ वाया जाणार नाही. या क्रमांकांवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.
घरगुती छळाला बळी पडलेल्या महिला राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करू शकतात.
घटनेची माहिती जर पोलिसांना घटनेची माहिती द्यायची असेल तर १०० आणि ११२ या क्रमांकावर कॉल करा. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांक ०११-२६९४२३६९, २६९४४७५४ आहेत.
कौटुंबिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला 181 तर रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक 182 वर कॉल करू शकतात.
दिल्ली महिला आयोगाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. DCW ला 011-23378044, 23378317, 23370597 वर कॉल करता येईल.
तुमच्या हक्कांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी 011-23385368, 9810298900 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय महिला कॉन्फरेंसशी 011-43389100, 011-43389101 आणि मुंबईतील स्नेहा एनजीओशी 98330 52684 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.