Manasvi Choudhary
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही ५ योगा प्रकार करा म्हणजे तुमचे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.
पवनमुक्तासन योगा प्रकार हा केल्याने पोटासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी या समस्या कमी होतात. पोटावर दाब पडल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
उत्तानपादसना केल्याने पाठीच्या खालच्या बाजूला बळकटी करते यामुळे ओटीपोटाचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. पोटाचे स्नायू टोन होतात.
नौकासन या योगासनामध्ये पोटाच्या स्नायूंना ताण देऊन चरबी कमी होते. पाठीचे आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात.
कंधरासन योगाप्रकार केल्याने पोटाच्या स्नायूंना ताण देऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते यामुळे पोटात गॅस, पोटफुगी होत नाही.
पादांगुष्ठासन योगासना केल्याने पोटावर ताण येतो यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. नियमितपणे हा योगा प्रकार केल्याने तुमचे वजन कमी होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.