Manasvi Choudhary
योगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगा केल्याने शरीराच्या स्नायूंची हालचाल सुधारते. योगा करण्याची देखील योग्य वेळ असते.
ऑफिस किंवा कामाच्या धावपळीतून येणारा मानसिक आणि शारीरिक थकवा घालवण्यासाठी संध्याकाळचा योग 'स्ट्रेस बस्टर' म्हणून काम करतो.
सायंकाळी योगा केल्याने शरीराची लवचिकता वाढते स्नायूंची हालचाल होते
संध्याकाळी योगा केल्याने मन शांत होते आणि शरीराला चांगली विश्रांती मिळते, परिणामी रात्री गाढ झोप लागते.
संध्याकाळी योगा केल्याने दिवसभर एका जागी बसून राहिल्याने होणारे पाठदुखी किंवा कंबरदुखीचे त्रास कमी होतात.
योगासने नेहमी रिकाम्या पोटी किंवा चहा-कॉफी घेतल्याच्या किमान १ तासानंतर करावीत.
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण योगाभ्यास मानला जातो. जो संपूर्ण शरीराच्या स्नायूंवर काम करतो. यात एकूण १२ स्टेप्स आहेत. ज्यामुळे शरीर लवचिक बनते आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.