Shreya Maskar
संध्याकाळची रिसेप्शन पार्टीला जायचे असेल तर सुंदर साडी नेसा. गडद रंगांच्या आणि चकाकणाऱ्या साड्यांची निवड करा.
संध्याकाळी लग्नाचे रिसेप्शन असेल तर मखमली, रेशीम, ऑर्गन्झा, सिल्क, नेट किंवा सॅटिन, शिमर-जॉर्जेटसारख्या कापडांची साडी सुंदर दिसते.
या साड्या पाचू, नेव्ही, वाईन यांसारख्या गडद रंगांमध्ये किंवा सोनेरी, चंदेरी यांसारख्या छटांमध्ये असतील तर तुमचे सौंदर्य आणखी खुलेल. रॉयल ब्लू , काळा हे रंग देखील सुंदर दिसतात.
साड्यांसोबत हॉल्टर नेक किंवा कॉर्सेट डिझाइनचे ब्लाउज परिधान करा. अधिक आकर्षक वाटतील. कॉर्सेट-शैली, स्लिव्हलेस, ऑफ शोल्डर ब्लाऊज छान दिसतात.
प्री-ड्रेप्ड साड्या, भरजरी जरीकाम असलेल्या साड्या, भरजरी भरतकाम केलेल्या ब्लाउजसह मिनिमलिस्ट साड्या हे सुंदर पर्याय आहेत.
रिसेप्शन एखाद्या बागेत असेल तर शिफॉनसारख्या हलक्या साड्यांची निवड करा. तसेच जर मोठ्या हॉलमध्ये रिसेप्शन असेल तर जड रेशमी कापड आणि शिमरी साडी निवडा.
तुमचा लूक अधिक खुलवण्यासाठी साडी नेसल्यावर कंबरेला स्टाइलिश पट्टा बांधा. तसेच उंच टाचांच्या सँडल्स, क्लच यांसोबत लूक पूर्ण करा.
जास्त भडक मेकअप करणे टाळा. सुंदर मिनिमल मेकअप करून मॅचिंग ज्वेलरी परिधान करा. तुमचा लूक खूपच सुंदर दिसेल.