Surabhi Jayashree Jagdish
महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांमध्ये चिखलदरा हे एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन मानलं जातं. अमरावती जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, डोंगररांगा आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
चिखलदरा हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे ठिकाण विदर्भातील एकमेव मान्यताप्राप्त हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. जळगावपासून अवघ्या २८४ किमी अंतरारवर आहे हे हिल स्टेशन.
चिखलदरा समुद्रसपाटीपासून सुमारे 1,118 मीटर उंचीवर वसलेलं आहे. त्यामुळे याठिकाणी वर्षभर तुलनेने थंड आणि आल्हाददायक हवामान अनुभवायला मिळतं. उन्हाळ्यातही वातावरण सुखद असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होते.
चिखलदऱ्याभोवती हिरव्यागार डोंगररांगा आणि खोल दऱ्या पसरलेल्या आहेत. पावसाळ्यात संपूर्ण परिसर धुक्याने वेढला जातो आणि निसर्ग अधिक आकर्षक दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताची दृश्यं पाहण्यासारखी असतात.
चिखलदऱ्याकडे जाणारे रस्ते डोंगरांमधून वळणं घेत पुढे जातात. या मार्गावरून प्रवास करताना पर्यटकांना सुंदर दऱ्या आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. साहसी प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हा अनुभव विशेष ठरतो.
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून पर्यटक चिखलदऱ्याला भेट देतात. शांत वातावरणामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि निसर्गप्रेमी येथे सुट्टी घालवण्यासाठी येतात. विकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय मानलं जातं.
चिखलदऱ्यामध्ये अनेक व्ह्यू पॉइंट्स आणि निसर्गरम्य स्थळं पाहायला मिळतात. भिमकुंड, हरिकेन पॉइंट, देवी पॉइंट आणि पंचबोल पॉइंट ही याठिकाणची प्रसिद्ध आकर्षणं आहेत.