Alisha Khedekar
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
EV खरेदीपूर्वी अनेकांना घरी वाहन चार्ज केल्याने वीज बिल किती वाढेल? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
महिन्याला चार्जिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी राहू शकतो.
EV ची सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांचा प्रति किलोमीटर खर्च पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत खूप कमी असतो.
चार्जिंगचा खर्च बॅटरीची क्षमता, वाहनाचा वापर, रोजचे अंतर आणि स्थानिक वीज दरांवर अवलंबून असतो.
इलेक्ट्रिक कारमुळे घराच्या एकूण वीज वापरामध्ये साधारण 20 ते 30 टक्के वाढ होऊ शकते.
मासिक चार्जिंग खर्च
घरच्या घरी ईव्ही चार्ज केल्यास दर महिन्याला एक-दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.