Shreya Maskar
एरंगल बीच मुंबईतील मढ बेटावर वसलेला आहे. एरंगल बीच एक शांत, कमी गर्दीचा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.
एरंगल बीचजवळ हिरवागार निसर्ग, रंगीबेरंगी घरे, मासेमारीची गावे पाहायला मिळतात. 'ख्रिसमस'चा वन डे पिकनिक प्लान करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
एरंगल बीच हा मालाड पश्चिम भागात आहे. हा मुंबईतील हिडन स्पॉट आहे. हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.
एरंगल बीच हा अक्सा बीच आणि मार्वे बीचच्या जवळच आहे, कारण हे तिन्ही समुद्रकिनारे मालाड आणि मढ आयलंड परिसरातील आहेत.
मालाड स्टेशनवर उतरल्यावर तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने सहज एरंगल बीचला जाऊ शकता.
एरंगल बीचवरून सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
एरंगल बीच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे किनार्यावर मासे वाळवताना लोक दिसतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.