Shruti Vilas Kadam
कर्मचारी आणि कंपनीकडून PF मध्ये १२ टक्के योगदान देण्याचा नियम कायम राहणार आहे. १५ हजार रुपये मासिक बेसिक पगाराची मर्यादा लक्षात घेता किमान १,८०० रुपये योगदानाची तरतूद आहे.
EPFची वेतन मर्यादा केंद्र सरकारकडून ठरवली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मर्यादेत बदल होण्याची शक्यता आहे.
PF मधून पैसे काढण्याच्या अनेक श्रेणी कमी करून त्या तीन प्रमुख श्रेणींमध्ये विभागण्यात आल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन गरज, घर आणि विशेष परिस्थितींचा समावेश आहे.
नव्या नियमानुसार PF खात्यातील किमान २५ टक्के रक्कम सुरक्षित ठेवावी लागेल. पात्र अटी पूर्ण केल्यास उर्वरित ७५ टक्के रक्कम काढता येऊ शकते.
पात्र कारणांसाठी PF मधून पैसे काढण्यासाठी किमान १२ महिन्यांची सेवा पूर्ण करावी लागणार आहे. वैद्यकीय कारणांसाठीही ही अट लागू असल्याचे सांगितले जात आहे.
PF क्लेमचा निपटारा करण्यासाठी २० दिवसांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वैध कारण नसताना क्लेमला उशीर झाल्यास १२ टक्के दंडात्मक व्याजाची तरतूद आहे.
ऑनलाइन नॉमिनेशन प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण PF रक्कम काढण्यासाठी १२ महिने बेरोजगार राहण्याची अट असल्याचे वृत्त आहे.