EPF मध्ये नॉमिनी बदलायचा कसा? सोप्या स्टेप्सनं घ्या समजून

Bharat Jadhav

ऑनलाइन नॉमिनी बदलू शकता

ईपीएफ अकाउंटमध्ये ऑनलाइन नॉमिनेशनच्या सुविधेचा फायदा फक्त यूनिव्हर्सल अकाउंट नंबर व्हेरिफाय असणारे लोकच घेऊ शकतात. ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला अखेरीस e-Sign करावं लागेल.

e-Sign कसं करायचं?

यासाठी तुम्ही आपला व्हेरिफिकेशन नंबर किंवा मग 16-अकांच्या व्हर्जुअल आयडीचा वापर करू शकता. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. जो नोंदवल्यानंतर नॉमिनेशनची प्रोसेस पूर्ण होते.

व्हर्चुअल आयडी कसा जनरेट करावा?

सुरक्षतेच्या कारणामुळे तुमचं आधार नंबर शेअर करू इच्छित नसाल तर व्हर्चुअल आयडीचा वापर करू शकता. हे जनरेट करणं खूप सोपं आहे.

कसा जनरेट करा

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. आता ‘Aadhaar Services’ च्या आत दिलेल्या ‘Virtual ID (VID) Generator’ ऑप्शन निवडा.

ओटीपी

त्यानंतर 12-अंकांचा नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदवल्यानंतर तुम्हाला नवीन VID जेनरेट करणे किंवा जुना परत मिळवण्याचा ऑप्शन मिळेल.

हे ठेवा लक्षात

ऑप्शन निवडताच 16-अंकांचा VID तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दरवेळी नवीन VID बनवल्यावर जुना एक्सपायर होत असतो.

e-Nomination साठी या गोष्टी हव्या

आधार नंबर,नाव, लिंग, जन्म तारीख, नात्याची माहिती, पत्ता, फोटो, बँक अकाउंटची माहिती

हेही वाचा

येथे क्लिक करा

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात