Bharat Jadhav
सध्याच्या जगात इंग्रजी येणे खूप महत्वाचे बनलंय. परंतु अनेकजण इंग्रजीमध्ये बोलायला घाबरतात.
प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड असतो.
आज आपण अशा काही टिप्सविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे इंग्रजीत बोलायला भीतीही वाटणार नाही.
इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर दररोज किमान 10-12 शब्द, त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ माहित करुन घ्या.
सोप्या भाषेत शब्द प्रयोग असलेली इंग्रजी पुस्तके विकत घ्या. तुमच्या आवडीची गोष्टींची पुस्तके वाचा.
इंग्रजी सुधारण्यासाठी तुम्ही इंग्रजी गाणी किंवा पॉडकास्ट ऐकू शकता. यामुळे अनेक नवीन शब्द कानावर पडतील. ते शब्द लक्षात ठेवा त्याचा वापर बोलण्यात करा.
इंग्रजी सुधारण्यासाठी तुम्ही सबटायटल्ससोबत इंग्रजी चित्रपट पाहा. यामुळे तुम्हाला भरभर इंग्रजी वाचण्याची सवय लागेल.
रोज इंग्रजीत काहीना काही लिहिण्याचा सराव ठेवा. तुम्ही मराठी ते इंग्रजी भाषांतर देखील करू शकता.
तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि मित्रांशी इंग्रजीत बोलू शकता. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
येथे क्लिक करा