ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुलाव, पापड, समोसा, जलेबी, भजी आणि इतर पदार्थ आपण सर्व आवडीने खातो . तुम्ही कधी विचार केला आहे का. कि, या पदार्थांना इंग्रजीत काय बरं म्हणत असतील ? चला तर जाणून घेऊया.
भारतात कोणत्याही कार्यक्रमात बनवण्यात सोपा असलेला आणि अगदी सगळ्यांच्याच पसंतीचा पदार्थ म्हणजे ' पुलाव '. याला इंग्रजीमध्ये Pilaf किंवा Casserole असे म्हटले जाते.
पुलावासोबत बनवला जाणारा कुरकुरीत पापड. याला इंग्रजीमध्ये Poppadom असे म्हणतात.
संध्याकाळ झाल्यावर काहीतरी गरमागरम, चटपटीत खावसं वाटतंय? या विचाराला आधार देणारा - समोसा. याचे इंग्रजी नाव Rissole असे आहे.
सणासुदीला या पदार्थांना ताटात हक्काची जागा असते. नुस्त पाहुनच तोंड गोड करणाऱ्या जिलेबीला इंग्रजीत Funnel Cake तर गुलाबजामला Deep-Fried Milk Balls In Syrup असे म्हणतात.
पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक घरात हमखास भजी बनवली जाते. भजी ला इंग्रजीत Fritters असे म्हणतात.
पोटाला थंडावा देणाऱ्या लस्सी ला इंग्रजीत Churned Curd असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत शेवयांशिवाय देवाचे नैवेद्य पूर्ण होत नाही. या शेवयांचे इंग्रजी नाव Vermicelli असे आहे.
साजुक तुपातला गोडाचा शिरा. याला इंग्रजीत Semolina Pudding असे म्हणतात.