ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्यायाम शरीरासाठी खुपच फायदेशीर ठरते. म्हणून नियमितपणे व्यायाम आणि मन:शांती साठी योगसाधना करणेही आवश्यक आहे. यामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा राहते.
मानसिक आरोग्यासह इम्युनिटीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी एक परिपूर्ण आहार घ्यायला हवा.
बरेचजण सकाळचा पूर्ण नाश्ता करत नाहीत. ज्यामुळे सारखी भुक लागते, कामात लक्ष लागत नाही आणि दिवसभर सुस्तपणा येतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात एका एनर्जेटिक नाश्त्याने करायला हवी.
तुमचा सकाळचा नाश्ता हा फायबरयुक्त तसेच न्युट्रिशन्सने परिपूर्ण हवा. जेणेकरून दिवसभराची एनर्जी टिकून राहील.
भिजलेले नट्स खाल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण सुधारते, तसेच पचनक्षमता वाढते. शरीराला योग्य न्युट्रिशन्स मिळतात. त्यामुळे हे ऊर्जेचे एक चांगले स्रोत आहे.
दूधामध्ये सांधे आणि हाडांना मजबूती देणारे पोषक घटक असतात. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएन्ट्स असतात जे शरीरासाठी उपयुक्त ऊर्जेमध्ये रूपांतरीत होतात आणि थकवा येत नाही.
तुम्ही नॉनवेज किंवा एगिटेरीअन असाल तर रोज सकाळी २-३ अंडी खा. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले प्रोटीन शरीराला ऊर्जा पुरवतात.
मूग, मटकी आणि काळे चणे अशा अंकूरीत कडधान्यांचे सॅलेड बनवून खाऊ शकता. यामधील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी कमी करून शरीरात ऊर्जा निर्माण करतात.
सकाळी नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करा. यामधील कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू रक्तात ग्लुकोज सोडतात. ज्यामुळे जास्तकाळ पोट भरलेलं राहतं आणि ऊर्जा टिकून राहते.