Empty stomach: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

Surabhi Jayashree Jagdish

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात अॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ शकतं. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Morning health tips | saam tv

आंबट फळांचं सेवन

लिंबू, संत्रं, मोसंबी यांसारख्या फळांमध्ये सिट्रिक अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. ही फळं रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ, मुरडा पडणं किंवा अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.

Acidity | saam tv

हेवी वर्कआऊट

सकाळी काहीही न खाता हेवी वर्कआऊट किंवा डेडलिफ्टसारखे व्यायाम केल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येण्याची शक्यता वाढते.

Acid reflux | saam tv

तळलेले आणि मसालेदार पदार्थ

रिकाम्या पोटी तळलेले किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटावर ताण येऊ शकतो. यामुळे अॅसिडिटी, जळजळ आणि अपचनाचा त्रास वाढू शकतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हलके आणि पौष्टिक पदार्थ निवडणं योग्य आहे.

Digestive health | saam tv

च्युइंग गम

च्युइंग गम चघळल्याने पोटाला अन्न येत असल्याचा संदेश मिळतो आणि पचनासाठी आम्ल तयार होऊ लागतं. मात्र प्रत्यक्षात अन्न न मिळाल्यास हे आम्ल पोटाच्या आतील अस्तरावर परिणाम होतो.

Tea on empty stomach | saam tv

औषधं घेऊ नका

काही औषधं रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या आतील आवरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जळजळ, पोटदुखी किंवा गॅस्ट्रिक त्रास वाढण्याचा धोका असतो. डॉक्टरांनी विशेष सूचना दिल्या नसतील तर औषधं अन्नानंतर घेणं अधिक सुरक्षित असते.

Citrus fruits | saam tv

हेल्दी पर्याय

रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं किंवा रात्री भिजवलेले बदाम खाणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. नाश्त्यात पपई किंवा केळे यांसारखी सहज पचणारी फळं घेतल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

Chewing gum | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diet | pinterest

Chia seeds: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी कधी खावेत चिया सिड्स?

Chia seeds | saam tv
येथे क्लिक करा