Dhanshri Shintre
गाडी चालवताना अनेकजण फक्त टायरमधील हवा, पाणी आणि पेट्रोल याच मूलभूत गोष्टींकडे लक्ष देतात.
मात्र, प्रवासादरम्यान कधीही टायर पंक्चर, बॅटरी डाऊन होणे किंवा इतर अचानक समस्या उद्भवू शकतात याची शक्यता असते.
अशा वेळी लोकांना मदतीसाठी मित्राला फोन करून मेकॅनिकची व्यवस्था करावी लागते, ज्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाढतो.
यामुळे लोकांच्या कामावर परिणाम होतो, परंतु गाडीत आवश्यक उपकरणे असल्यास तुम्ही या अडचणी सहजपणे हाताळू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र अशी कागदपत्रे एका फोल्डरमध्ये ठेवून गाडीत कायम सोबत बाळगणे आवश्यक आहे.
गाडीत एक सुटे टायर आणि जॅक असणे गरजेचे आहे, जे पंक्चरच्या वेळी उपयोगी पडते. टायर योग्य स्थितीत ठेवा.
अपघात किंवा किरकोळ जखमांसाठी प्रथमोपचार किट महत्त्वाचे आहे. त्यात बँडेज, अँटीसेप्टिक वाइप्स व आवश्यक औषधे ठेवा आणि डेट तपासत रहा.
गाडीत जंपर केबल्स ठेवा, जेणेकरून बॅटरी डिस्चार्ज झाल्यास दुसऱ्या वाहनातून बॅटरी चार्ज करता येईल. थंड ठिकाणी हे खूप उपयोगी ठरते.
गाडी अचानक बंद पडल्यास ती ओढण्यासाठी मजबूत दोरी किंवा टो दोरी असणे आवश्यक असून अशा वेळी ती खूप उपयोगी ठरते.