Dhanshri Shintre
इलेक्ट्रोल पावडरमध्ये सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि ग्लुकोज असते, जी इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून शरीराला उर्जा देते. फायदे-तोटे जाणून घ्या.
उलट्या, जुलाब किंवा घामामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. अशा वेळी इलेक्ट्रोल पावडर जलद हायड्रेशनसाठी उपयुक्त ठरते.
इलेक्ट्रोल पावडरमधील ग्लुकोज त्वरित ऊर्जा देते, थकवा कमी करते आणि उष्णतेत वा व्यायाम करताना शरीराची स्फूर्ती टिकवून ठेवते.
स्नायू आणि नसांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी सोडियम-पोटॅशियम आवश्यक असतात. इलेक्ट्रोलाइट्स त्यांचे संतुलन राखून शरीराचे कार्य नियमित ठेवतात.
अती सेवनामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हात-पाय तसेच चेहऱ्यावर सूज येण्याची शक्यता वाढते.
इलेक्ट्रोल पावडरमध्ये साखरेचे प्रमाण असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ती वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
शरीर डिहायड्रेट नसल्यास इलेक्ट्रोलाइट पावडरचा उपयोग होत नाही, उलट त्याचा अतिरेक मूत्रपिंडांवर ताण आणू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.