Manasvi Choudhary
डायबिटीजच्या रूग्णांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी. रक्तातील साखर वाढू नये म्हणून खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
डायबिटीज असलेले रूग्ण अंडी खाऊ शकतात का? असा प्रश्न अनेकांना असतो.
डायबिटीजचे रूग्ण अंडी खाऊ शकतात कारण अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते यामुळे अंडी खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढत नाही.
अंड्यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे अंडी खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन नियंत्रणात राहते.
अंड्यामध्ये पौष्टिक जीवनसत्त्वे असतात, जी शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.
मधुमेहाच्या रुग्णांना हृदय संबंधित आजार उद्भवू शकतो. अंड्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे गुणधर्म असतात यासाठी मधुमेहींनी अंडी खावे ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.