Egg Benefits: मेंदू, डोळे ते शरीरातील हाडं...; रोज २ उकडलेली अंडी खाल्ली तर कोणते बदल होतात?

Shruti Vilas Kadam

हाडांसाठी महत्वाचं

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी दोन अंडी उत्तम पर्याय आहे.

boiled eggs for breakfast benefits | Google

शरीराला भरपूर प्रोटीन मिळतात

दोन मोठ्या उकडलेल्या अंड्यांमधून साधारण १२ ते १३ ग्रॅम प्रोटीन मिळतात. प्रोटीन स्नायूंची वाढ आणि शरीरातील पेशींच्या कार्यासाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे संतुलित आहारात अंड्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

boiled eggs health benefits | saam tv

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

उकडलेल्या अंड्यांमध्ये प्रोटीन असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, वजन कमी होण्यासाठी एकूण आहार आणि शारीरिक हालचालीही महत्त्वाच्या आहेत.

eggs health benefits | egg diet benefits

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अंड्यांमध्ये कोलीन नावाचा महत्त्वाचा पोषक घटक असतो. हा घटक मेंदू, मज्जासंस्था आणि स्मरणशक्तीसाठी आवश्यक असतो. त्यामुळे अंडी खाल्ल्याने शरीराची कोलीनची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

Eggs health benefits | saam tv

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झिअ‍ॅक्सॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून वयानुसार होणाऱ्या काही डोळ्यांच्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

Benefits Of Boiled Egg | Canva

शरीराला एनर्जी आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात

दोन उकडलेल्या अंड्यांमधून साधारण १४० ते १६० कॅलरीज मिळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन ए आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात. हे घटक शरीरात एनर्जी निर्माण करायचे काम करतात.

Egg Benefits

कोलेस्टेरॉलवर काय परिणाम होतो?

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे हा पिवळा बलक खाणे शक्यतो टाळावे. रोज दोन अंडी खाणे प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

Egg Benefits

Heart Patient Walking: हार्ट पेशंट्सनी रोज किती पावले चालावे? जाणून घ्या चालण्याचे फायदे आणि घ्यायची काळजी

Heart Patient Walking | Saam Tv
येथे क्लिक करा