ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल वाढते काम आणि ताण यामुळे बहुतेक लोकांना मायग्रेनच्या समस्येला सामोरे जावे लागते.
अशात पेन किलर्सच्या औषधांमुळे तात्पुरता आराम मिळतो. पण ते सतत घेतल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
यामुळे यकृत आणि मुत्रपिंडासंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
जर तुम्हालाही मायग्रेनचा त्रास होत असेल तर, ही जपानी ट्रिक अतिशय उपयुक्त ठरेल.
शियात्सू थेरपी ही एक पारंपरिक जपानी उपचार पद्धती आहे.
यामध्ये शरिरावरील अॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब देऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
अंगठा आणि तर्जनीच्या मध्यभागी १-२ मिनिटे दाब दिल्याने डोकेदुखी आणि ताण कमी होतो.
याचप्रमाणे कानाच्या मागील बाजूच्या हाडाजवळ हलक्या हाताने मसाज केल्यानेही डोकेदुखी पासून आराम मिळतो.
मानेवर किंवा कपाळावर गरम पाण्याची पट्टी ठेवल्याने सुद्धा रक्तप्रवाह सुधारून डोके दुखीच्या वेदना कमी होतात. याला हॉट कॉम्प्रेस म्हणतात.