ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभ्यास करताना अनेकवेळा आपल्याला सांगितले जाते, जेव्हा मनापासून अभ्यास करायचा असतो तेव्हा कोणतीही वेळ चांगलीत असते.
पण काही तज्ञ व्यक्तींच्यामते, सकाळी उठून अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. मात्र नक्की काय फायदे आहेत ते आपण पाहूयात.
सकाळी आजूबाजूचा परिसर तसेच घरातील वातावरण शांत असल्याने अभ्यास चांगला होतो.
सकाळी लवकर उठून अभ्यास केल्याने एकाग्रता वाढते, ज्या गोष्टी समजायला तुम्हाला थोडा वेळ लागतात त्या गोष्टी लवकर समजतात.
सकाळी आपली विचार करण्याची क्षमता तीक्ष्ण असते,त्यामुळे काही वाचल्यास आपल्या ते कायम स्वरूपी लक्षात राहू शकते.
सकाळी लवकर उठताना आपल्या डोक्यात जास्त कामाचा तणाव नसतो,त्यामुळेही अभ्यास चांगला होऊ शकतो.
सकाळी लवकर अभ्यासपूर्ण केला तर दिवसभरातील काही वेळ आपण अन्य कामासाठी देता येतो.