Eating Method : जमिनीवर बसून की डायनिंग टेबलवर? नक्की कोणत्या पद्धतीने जेवणे ठरेल शुभ आणि हेल्दी?

Shreya Maskar

जमिनीवर बसून जेवणं की डायनिंग टेबलवर?

वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार, जमिनीवर मांडी घालून बसून जेवणे ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते. याला सुखासन म्हणतात.

Sitting on the floor or at the dining table? | pinterest

आरोग्याचे फायदे

मांडी घालून बसल्याने शरीराचा समतोल राखला जातो, पचनसंस्था मजबूत होते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच मन शांत होते.

Health Benefits | pinterest

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, जमिनीवर जेवताना कधीही सुती, लोकरीची चटई घालून त्यावर बसावे. उघड्या जमिनीवर बसल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा जमिनीत विस्थापित होते. चटई अंथरल्याने ऊर्जा वाचते आणि अन्नाचा शरीरावर होणारा परिणाम सुधारतो.

Vastu Shastra | pinterest

जमिनीवर बसून जेवताना

जमिनीवर बसून जेवताना, ताट थेट जमिनीवर ठेवणे टाळावे. त्याऐवजी ताट एका लहान स्टूलवर किंवा स्टँडवर ठेवणे उत्तम. ताट आसनापेक्षा थोडे उंच असावे. यामुळे अन्नाबद्दल आदराची भावना टिकून राहते.

While eating on the floor | pinterest

डायनिंग टेबलवर जेवताना

जेवणाचे टेबल चौरस किंवा आयताकृती असावे. गोल टेबले ऊर्जा संतुलनासाठी योग्य मानले जात नाही. जेवणाची खोली किंवा टेबल घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. जेवताना कुटुंबातील सदस्यांनी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. यामुळे सकारात्मक वातावरण टिकून राहते.

While eating at the dining table | pinterest

आरसा ठेवा

जेवणाच्या टेबलासमोर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. आरशात अन्नाचे प्रतिबिंब दिसल्याने घरात अन्न आणि संपत्ती वाढते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आरसा स्वच्छ आणि योग्य उंचीवर असावा.

Place a mirror | pinterest

शुभ दिशा कोणती?

पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्याची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्याने पचनक्रिया सुधारते. उत्तर दिशा ज्ञान आणि संपत्तीशी संबंधित आहे, त्यामुळे ती विद्यार्थी आणि नोकरदार लोकांसाठी शुभ मानली जाते.

Which is the auspicious direction? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : डायबिटीजमध्ये औषधासारखं काम करतं 'हे' १ फळ, रोज खाल्ल्याने शुगर राहील कंट्रोलमध्ये

Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...